फक्त व्यसनमुक्ती नव्हे, पुनर्वसनदेखील!
व्यसनमुक्ती होणे हे व्यक्तीच्या मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यसनामुळे अनेक पिढ्या बरबाद होताना बघत बसणे योग्य नाही. व्यसनामुळे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाची हानी तर होतेच, शिवाय सामाजिक हानीदेखील न मोजता येण्यासारखी असते. विशेषतः २० ते ३० वर्षे वयोगटातील मुले व्यसनाधीन होणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे. त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी आम्ही धडपड करीत आहोत.
यशवंत व्यसनमुक्ती केंद्राबद्दल थोडं जाणून घेऊ.
सन २००५ मध्ये स्थापन झालेलं यशवंत व्यसनमुक्ती केंद्र हे आज महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह आणि यशस्वी पुनर्वसन केंद्र म्हणून ओळखलं जातं. व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन देणं, त्यांच्या कुटुंबांना आधार देणं आणि समाजात पुनःस्थापित करणं हे या केंद्राचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
- दारू, गांजा, तंबाखू, ड्रग्ज इत्यादी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता
- ध्यान, योग व आध्यात्मिक सत्रे, कौटुंबिक समुपदेशन आणि पुनर्वसन कार्यक्रम
- अनुभवी डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम
यशवंत व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला फक्त व्यसनमुक्त करून न काम थांबवले जात नाही, तर त्याच्या संपूर्ण पुनर्वसनाचा प्रयत्न केला जातो. हिप्नोथेरेपी, रेकी थेरेपी, कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरेपी याद्वारे रुग्णाच्या आंतर्बाह्य विचारांमध्ये बदल केले जातात. कुटुंबात, समाजात त्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली जाते. आपल्या आयुष्यात व्यसनाचा एक काळाकुट्ट टप्पा आला होता, याचाही विसर रुग्णाला पडतो. व्यसनमुक्ती जरी काळाची गरज असली, तरी त्याविषयी समाजात अनेक समज गैरसमज आहेत. त्या अनुषंगाने डॉ. साथना पाटील विविध ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. त्यांच्या मते व्यसनमुक्तीसाठी तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे स्वनिग्रह, कुटुंबाचं सहकार्य आणि योग्य औषधोपचार. त्यांचा पुरेपूर वापर करत त्यांनी व्यसनमुक्तीच्या सामाजिक कामाचे शिवधनुष्य पेलले आहे. या कामात त्यांना पती डॉ. राजाराम यांच्यासह कुटुंबीयांचे पुरेपूर पाठबळ मिळत आहे.
प्रभावी उपचारपद्धती आणि समुपदेशन
निसर्गोपचार (Naturopathy)
निसर्गोपचार व्यसनमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी ठरतो कारण तो शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर काम करतो. शरीरातील विषद्रव्ये (toxins) नैसर्गिकरीत्या बाहेर काढून मसाज, सूर्यस्नान, जलचिकित्सा यामुळे झोप, पचन, आणि मानसिक स्थैर्य सुधारते.
हिप्नोथेरपी (Hypnotherapy)
हिप्नोथेरपी मनातील व्यसनाशी जोडलेले विचार, सवयी आणि ट्रिगर्स बदलण्यात मदत करते. आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढवते. ताण, भीती, अपराधगंड कमी करून सकारात्मक विचार निर्माण करते. पुन्हा व्यसनाकडे वळण्याची शक्यता कमी करते.
रेकी थेरपी (Reiki Therapy)
रेकी थेरपी ही ऊर्जा-उपचार पद्धती आहे जी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संतुलित करून व्यसनमुक्तीस मदत करते. मन, शरीर आणि भावना यांचं ऊर्जा-संतुलन पुनर्स्थापित करते. नकारात्मक विचार व तणाव कमी करून शांतता निर्माण करते. आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रण वाढवते.
कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी
कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी ही वैज्ञानिक पद्धत आहे जी व्यसनाशी संबंधित विचार आणि वर्तन बदलण्यावर लक्ष केंद्रित करते. व्यसनाला कारणीभूत ठरणारे नकारात्मक विचार ओळखून परिस्थिती हाताळण्यासाठी नवीन सकारात्मक प्रतिक्रिया शिकवते.
आर्ट थेरपी (Art Therapy)
आर्ट थेरपी म्हणजे कलाद्वारे मन मोकळं करण्याची आणि आत्मअभिव्यक्तीची उपचारपद्धती. चित्रकला, रंगकाम, हस्तकला यांद्वारे दडपलेल्या भावना व्यक्त करता येतात. मनातील ताण, राग, अपराधगंड कमी होतो. व्यसनापासून मनाचं लक्ष सकारात्मक दिशेने वळतं.
योगा आणि मेडिटेशन
योगा आणि मेडिटेशन व्यसनमुक्तीसाठी शरीर आणि मन या दोन्हींचं संतुलन साधतात. शरीरातील ताण, बेचैनी आणि अस्वस्थता कमी करतात. श्वसनक्रिया आणि ध्यानामुळे मन स्थिर होतं. मन शांत होऊन इच्छाशक्ती मजबूत होते.
अविस्मरणीय क्षण
यशवंत व्यसनमुक्ती केंद्रात प्रत्येक सण हा फक्त आनंदाचं नव्हे, तर नव्या जीवनाचा उत्सव असतो. दिवाळी, रक्षाबंधन, सत्यनारायणासारखी पूजा एकत्र केली जाते. हे अध्यात्मिक वातावरण रुग्णांना मनःशांती, श्रद्धा आणि आत्मविश्वास देते. वाढदिवस, पुनर्वसन पूर्ण झालेल्या रुग्णांचा “नवजीवन दिन” साजरा केला जातो. योग, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि प्रोत्साहनपर भाषणांमुळे वातावरण नेहमी सकारात्मक राहते. प्रत्येक सणातून “एकत्रता, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचा संदेश” दिला जातो.
काही क्षण आठवणींचे
यशवंत व्यसनमुक्ती सेंटरमध्ये सर्वजण एकत्र कुटुंब म्हणून राहतात. सण वार, उत्सव अगदी थाटामाटात सर्वजण मिळून साजरे करतात. घराची किंवा घरातल्या माणसांची उणीव भासू नये म्हणून विविध माध्यमातून रुग्णांना एकत्रित ठेवण्याचं काम केले जाते.
दिवाळी सेलिब्रेशन
सर्व रुग्णांनी मिळून फटाके फोडून एकत्रित दिवाळी साजरी केली.
आषाढी एकादशी
सर्वानी मिळून आषाढी एकादशीनिमित्त सजावट केली व भक्तिभावे विठूरायाची भजने केली.
नातेवाईकाची प्रतिक्रिया
व्यसनमुक्त झालेल्या नातेवाईकाची प्रतिक्रिया देताना त्यांना आपल्या येथे आलेला अनुभव त्यांनी सांगित
आमचा उद्देश
अमली पदार्थ दारू, तंबाखू, ड्रग्स किंवा इतर कोणत्याही व्यसनाचे बळी ठरलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त करणे आणि त्यांना पुन्हा समाजात सन्मानाने जीवन जगण्यासाठी तयार करणे तसेच व्यसनाधीन व्यक्तीचे शारीरिक, मानसिक, सामाजिक पुनर्वसन करणे. अधिक माहितीसाठी कॉल करा.
आमचे कार्य व मिळालेले पुरस्कार
डॉ. साधना राजाराम पाटील यांचे कार्य.
स्त्रियांचे हे दुःख एका स्त्रीनेच समजून, जाणून घेतले, त्या म्हणजे शिराळ्याच्या डॉ. साधना पाटील. गेल्या काही वर्षात त्यांनी सल्ला, समुपदेशन न औषधोपचारांच्या माध्यमातून थोड्या थोडक्या नव्हे, तर तब्बल १८ हजार जणांना दारूच्या व्यसनातून बाहेर काढले आहे. दारूपायी उद्ध्वस्त झालेल्या संसारात आनंदाची कारंजी फुलवली आहे. आज हजारो महिला त्यांना दुवा देत आहेत.
- १८००० पेक्षा जास्त व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशन करण्यात यशस्वी.
- विविध शाळा, महाविद्यालयांमधून 'तरूणाई व वाढती व्यवसनाधीनता' विषयावर व्याख्याने.
- जिल्ह्यातील विविध गावातून विधवा प्रथा बंद करण्यास पुढाकार.
- महिला संघटन व सक्षमीकरणात अग्रेसर.
- विद्यार्थी समुपदेशन, पालक समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन, महिला सक्षमीकरण विषयावर व्याख्याने.
- विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग.
मिळालेले पुरस्कार व सन्मान
- व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी केंब्रिज विद्यापीठाकडून डॉक्टरेट.
- सकाळ माध्यम समूहातर्फे आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार.
- आनंदगंगा फाऊंडेशन कोल्हापूर अंतर्गत नारीशक्ती पुरस्कार.
- निर्मिती मंच कोल्हापूर अंतर्गत महात्मा फुले विचार प्रेरणा पुरस्कार.
- महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन अंतर्गत नवदुर्गा पुरस्कार ज्योत सावित्री पुरस्काराने सन्मानित.
- गौरव कलेचा पुरस्काराने सन्मानित ज्योत सावित्रीपुरस्काराने सन्मानित.
- लोकमत समूह अंतर्गत Women Icon OF Sangli पुरस्काराने सन्मानित.
- प्रतिष्ठा फाऊंडेशन सांगली अंतर्गत स्त्री प्रतिष्ठा आरोग्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त.
- श्री महाराज पंचतत्व उपासना पीठ सांगली अंतर्गत ललितसहित्य संमेलन आरोग्यसेवा पुरस्कार प्राप्त.
आमची टीम
व्यसनमुक्ती केंद्रातील टीम म्हणजेच त्या केंद्राचे हृदय असते. प्रत्येक सदस्य आपापल्या क्षेत्रातील तज्ञ असतो आणि रुग्णांना नवजीवन देण्यासाठी एकत्रितपणे काम करतो. मुख्य डॉक्टर, मानसोपचार तज्ञ, समुपदेशक, थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ / केअरटेकर, योग शिक्षक / ध्यान प्रशिक्षक, स्वयंपाकी व सेवकवर्ग अशी व्यसनमुक्ती केंद्रातील ही संपूर्ण टीम एका कुटुंबासारखी कार्य करते आणि रुग्णाला व्यसनातून मुक्त करून, त्याला नवजीवन, आत्मविश्वास आणि शांती परत मिळवून देते.
डॉ. साधना राजाराम पाटील.
समुपदेशक, यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटर११ वर्षात १६ हजारांहून अधिक संसार वाचवले आहेत. १४ हजार लोकांना व्यसनाच्या गर्तेतून खेचून बाहेर काढले आहे. त्यांच्या या मोलाच्या कामगिरीची दखल केंब्रिज विद्यापीठाने घेतले आहे. डॉक्टरेट पदवी प्रदान करून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.
डॉ. राजाराम पाटील.
संचालक, यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटर2000 साली येरळा मेडिकल कॉलेज करी रोड येथे D.H.M.S.डिग्री घेऊन मी व माझ्या छोट्या भावाच्या नावे प्रत्येकी साडेसात हजार कर्ज घेऊन, एका दुर्गम भाग जिथे डोलीने पेशंट आणले जात होते मुसळधार पावसामध्ये दहा-पंधरा किलोमीटर दिवसा किंवा रात्री शिक्षक मित्रांना घेऊन पाच वर्ष तिथे सेवा व प्रॅक्टिस केली .
डॉ. सत्यजीत तुळशीदास पाटील
मनोचिकित्सक, यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटरव्यसनाधीन झालेल्या व्यक्तीचे डिटॉक्सिफिकेशन (Detox) प्रक्रियेचे सुरक्षितपणे निरीक्षण करून आवश्यकतेनुसार औषधोपचार देणे ही माझी प्रमुख जबाबदारी आहे.
श्री. सुजित नानासो पाटील
मानसोपचारतज्ञ, यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटररुग्णांचे भावनिक, मानसिक आणि वर्तनात्मक बदल समजून घेऊन व्यसनामुळे झालेल्या ताण, नैराश्य, चिंता आणि इतर समस्यांचे सखोल मूल्यांकन ही माझी प्रमुख जबाबदारी आहे.
डॉ. अरविंद वसंत कोरडे पाटील
मॅनेजिंग डायरेक्टर , यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटरकेंद्रातील प्रत्येक रुग्णाच्या पुनर्वसनासाठी, स्टाफच्या एकोप्यासाठी आणि संपूर्ण संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. शिवाय उपचार पद्धती आणि गुणवत्ता नियंत्रण, कर्मचारी व्यवस्थापन, प्रशासकीय आणि आर्थिक व्यवस्थापन अशा विविध कामांमध्ये माझा हातभार मिळतो.
पत्ता व संपर्क
पत्ता:
यशवंत हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती सेंटर, पाडळी रोड, औंढी फाटा, ता. शिराळा, जि. सांगली.
ई-मेल:
yashwantvyasanmukti2005@gmail.com
कॉल:
+91 9145694017