नमस्कार मी डॉक्टर राजाराम पाटील .
******************************************************************************************
- *********************************************
- *********************************************
- *********************************************
व्यसनाधीन व्यक्ती ही आपल्या सारखाच एक माणूस असतो .व्यसनाधीनता हा एक शारीरिक आणि मानसिक आजार आहे .कुटुंब आणि समाज यांनी ही गोष्ट स्वीकारणं अधिक महत्त्वाच आहे. त्याच्याकडे बघताना तिरस्काराच्या भावनेने न बघता एक आजारी व्यक्ती आहे आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी जे काही कराव लागणार आहे ते करणं गरजेचं आहे अशी मानसिकता असेल तरच तो पेशंट पूर्ण व्यसनमुक्त होतो.पेशंट किती ही चांगला असू दे किंवा वाईट असू दे त्याला कोणताही आजार असू दे किंवा नसू दे त्याला व्यसन बंद करण्याची इच्छा असू दे किंवा नसू दे त्याला योग्य औषध उपचार ,समुपदेशन, पुनर्वसन व कुटुंबाचा सर्व पातळीवर जाऊन पेशंटला याच्यातून व्यसनमुक्त करायचा आहे याच्यासाठी असलेला पाठिंबा, समाजाला काय वाटेल याचा विचार न करता माझी व्यक्ती ही व्यसनाधीन आहे त्याच्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी स्वीकृत पणा असेल तर आपण कोणत्याही व्यक्तीला व्यसनातून मुक्त करू शकतो .आपलं जीवनाचे ध्येय काय आहे ? आपल्याला जन्म कशासाठी मिळाला? आपल्याला कोणत्या जागतिक शक्तीने जन्म दिलेला आहे ?हे ज्याला ओळखता आलं ,तीच व्यक्ती इतिहास घडवू शकते.
आमचा झपाटलेला डॉक्टर मित्र ,सहकारी ,सिस्टर ,ब्रदर, मावशी स्टाफ व आम्हाला वेळोवेळी व्यावसायिक व जीवनाविषयक सल्ला देणारे कन्सल्टंट व मित्र यांच्या सहकार्याने आत्ता 70 पेशंट एकावेळी व्यसनमुक्त करता येतील असं सुसज्ज असलेल यशवंत व्यसनमुक्ती केंद्र... याच जागतिक स्तरावरती जागतिक दर्जाच भव्य दिव्य व्यसनमुक्ती केंद्र उभं राहत आहे.तिथे आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे? जे आपलं ध्येय आहे ते पूर्ण करणे हाच आमच्या आयुष्याचा, आमच्या जगण्याचा अर्थ. असे झपाटलेल्या माणसांना, झपाटलेल्या सहकार्यांना मित्रांना बरोबर घेऊन या जगामध्ये झपाटून व्यसनमुक्त करणे हाच आमचा हेतू असेल. म्हटलं जातं की तुम्ही एखादी इच्छा जेव्हा हृदयापासून व्यक्त करता...पाठपुरावा करता.. तेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळतेच. लवकरच आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचू हा आमचा आशावाद आहे.
आई शेतकरी, जीव तोडून कष्ट करून मामांच्या सहकार्याने वडिलांच्या साथीने आम्हा तीन भावंडांना मोठे केल. वडील मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी राहून भाड्याची टॅक्सी चालवून त्यांनी मोठं केलं .आमचे चुलते यशवंत पाटील (नाना) घाटकोपर येथे झोपडपट्टीमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये त्यांची तीन मुलं आणि त्यांच्याबरोबर मुंबई वस्तीमध्ये बोजा असणारा मी.. पण त्याची कुठलीही जाणीव होऊ न देता मला नाना आणि काकींनी डॉक्टर बनवलं. लहानपण सामान्य कुटुंबामध्ये खेडेगावात केल्यामुळे जवळून गरिबी काय असते ,व्यसनाधीनता व अशिक्षित पणा याचे होणारे कुटुंबावरती, समाजावरती दुष्परिणाम लहानपणापासून बघत आलो .लहानपणापासूनच इच्छा होती की समाजामध्ये लोकांमध्ये मिसळून शिक्षण किंवा आरोग्य व्यसनाधीनता विषयावर आपल्याला आयुष्यभर जेवढा चांगलं काम करता येईल तेवढं करायचं. लहानपणापासूनच शिक्षक किंवा डॉक्टर व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून आई-वडिलांचे मार्गदर्शन, नानांच सहकार्य वेळोवेळी भेटले. प्रत्येक वळणावर, सुखदुःखाच्या, अडीअडचणीच्या काळात पाठीशी नव्हे सोबत राहून सुखदुःखात अडीअडचणी मध्ये साथ देणारी अर्धांगिनी साधना तेवढ्यात सक्षमपणे आम्हाला आमच्याबरोबर आमची स्वप्न त्यांच्या ध्येयाशी बाळगून वाटचाल करणारे आमची मनू..एमबीबीएस शिकत आहे व श्रीयश भैय्या जो सायकॉलॉजिस्ट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये करियर करणार आहे.ही स्वप्न सत्यात उतरवून व्यसनाधीनता व शिक्षण जेवढे जास्तीत जास्त काम करता येईल हे हृदयात स्वप्न बाळगून आमच्या पावलावर पाऊल टाकणारे आमची मुलं.
2000 साली येरळा मेडिकल कॉलेज करी रोड येथे D.H.M.S.डिग्री घेऊन मी व माझ्या छोट्या भावाच्या नावे प्रत्येकी साडेसात हजार कर्ज घेऊन, सेकंड हॅन्ड एम ए टी घेऊन ,सेकंड हॅन्ड फर्निचर घेऊन वाकुर्डे खुर्द वाकुर्डे बुद्रुक अंत्री खुर्द येथे एक वर्ष व नंतर बिरवाडी महाड ,रायगड जिल्ह्यामध्ये एका दुर्गम भाग जिथे डोलीने पेशंट आणले जात होते मुसळधार पावसामध्ये दहा-पंधरा किलोमीटर दिवसा किंवा रात्री शिक्षक मित्रांना घेऊन पाच वर्ष तिथे सेवा व प्रॅक्टिस केली .तिथला अनुभव गाठीशी घेऊन 2005 मध्ये शिराळा जे तालुक्याचे ठिकाण आहे ,डोंगरी विभाग आहे असं शासनाने जाहीर केलेल्या आमच्या तालुक्याचे गाव येथे छोटसं हॉस्पिटल ची सुरुवात केली. पहिल्यांदा खूप मोठ व्यसनमुक्ती केंद्र ,खूप मोठ हॉस्पिटल एवढ मोठ स्वप्न ,आपली असणारी आर्थिक अवस्था आपले असलेले पाठबळ आपली डिग्री यांच्या जोरावर कुठे स्वप्न बाळगण मोठी गोष्ट होती. पण शिराळ्यामध्ये ज्यावेळी छोटं हॉस्पिटल सुरू केल... त्यानंतर व्यसनमुक्ती मध्ये जीव ओतून काम करण्याचं ठरवलं .तिथून पुढे आमचा झपाटलेल्या ध्येयासाठी काम करण्याचा प्रवास सुरू झाला. पहिल्यांदा टेक केअर म्हणजे फक्त पेशंट तपासणी आणि त्यांना उपचार देणे घरी पाठवणं फॉलोअप साठी बोलवणं अशी उपचारांच स्वरूप होत.नंतर लक्षात आलं फक्त औषध हे फक्त उपचारांचे साधन नाही त्याला मानसोपचार, वेगवेगळ्या थेरपी, पेशंटचे समुपदेशन ,पेशंट व्यसनाधीन का झाला त्याचं कारण, त्या कारणावर काय उपाय करता येतील का? कुटुंबाचे समुपदेशन या सगळ्या चर्चा होणं खूप गरजेचं होतं .त्यासाठी पेशंट ऍडमिट होणे खूप आवश्यक वाटलं मग आम्ही व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरू केल.